नोंदणीकृत सामाजिक संस्था · नोंदणी क्र. महा/534/2000 (परभणी) · आयकर 12A व 80G मान्यताप्राप्त · NGO Darpan MH/2023/0346653
सूचना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 – प्रस्ताव आमंत्रित. माहिती व अर्ज | रोजगार पोर्टल – बेरोजगार युवकांसाठी नोंदणी सुरू

सामाजिक कार्य

समाजाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आमचे योगदान – 2000 पासून

दोन शब्द… – अध्यक्षांचे मनोगत

भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. साधारणत: आजही आपल्या देशातील 68% लोक ही ग्रामीण भागात राहतात. प्रामुख्याने त्यांचा व्यवसाय शेती आहे. त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे असे म्हटले तरी फारसे वावगे होणार नाही.

ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार केला तर ग्रामीण भाग आजही शहरी भागाच्या खूपच पाठीमागे आहे. कारण ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा शहरी भागाच्या तुलनेत कमी असूनसुद्धा ते आपल्या आवश्यक गरजासुद्धा पूर्ण करू शकत नाहीत.

भारतातील सर्वात मोठा भाग जर ग्रामीण भागात वास्तव्य करत असेल आणि त्यातील बहुतांश लोक आपल्या आवश्यक गरजादेखील पूर्ण करू शकत नसतील तर आपण भारताचा विकास झाला असे म्हणूच शकत नाही. जोपर्यंत या देशाचा कणा असणारा आणि सर्वात मोठ्या लोकसंख्येने ग्रामीण भागात वास्तव्य करणारा शेतकरी विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार नाही तोपर्यंत भारताचा विकास झाला असे आपणास म्हणता येणार नाही.

आज या शेतकरी वर्गासमोर अनंत अडचणींचा डोंगर उभा असतो. त्याला अनेक अडचणींचा सामना मोठ्या धैर्याने करावा लागतो आणि तो करतो सुद्धा. शेतकऱ्याला शेतीच्या मशागतीपासून ते त्याने घेतलेल्या उत्पादनापर्यंत अनेक प्रकारचे खर्च असतात – बियाणे, औषध फवारणी, कोळपणी, खुरपणी, काढणी – पीक येईपर्यंत अनेक प्रकारचा खर्च सुरुवातीलाच करावा लागतो. एवढा खर्च करून सुद्धा ते पीक येईल की नाही हे मात्र नक्की सांगता येत नाही, कारण शेती निसर्गावर अवलंबून आहे. कित्येक वेळा तयार झालेले पीकसुद्धा निसर्गाच्या अवकृपेमुळे हातातून जाते. पीक आले तर माल बाजारपेठेत नेल्यानंतर त्याला भाव काय मिळेल याचीही खात्री नाही, कारण भाव त्याच्या हातात नाही. या आणि अशा अनेक कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्याने उत्पादित केलेला कच्चा माल कवडीमोल किंमतीत खरेदी करून त्याचे रूपांतर पक्क्या मालात करून भांडवलदार मात्र भरगच्च पैसा कमवत आहेत. त्यामुळे गरीब तो अती गरीब आणि श्रीमंत तो अती श्रीमंत होत चालला आहे. हा कष्टकरी शेतकरी जो जगाचा अन्नदाता आहे, जो जगाचे उदर भरविण्याचे पुण्यकर्म करतो, तो मात्र दुर्दैवाने उपाशी आहे. त्याच्यावर अन्याय झाला तर त्याविरोधात वाचा फोडणारे सक्षम संघटनही नाही.

म्हणून जगाचा जो अन्नदाता आहे, तो उपाशी झोपला नाही पाहिजे. त्यामुळे या सर्व शेतकरी-कष्टकऱ्यांच्या पाठीमागे शिव प्रतिष्ठान खंबीरपणे उभे असेल, असा मी आपणास विश्वास देतो.

श्री. मदनजी रेनगडे पाटील – संस्थापक अध्यक्ष, शिव प्रतिष्ठान

शिव प्रतिष्ठानचे सामाजिक कार्यातील योगदान

स्थापनेपासून (29 डिसेंबर 2000) आजपर्यंत राबविलेले प्रमुख उपक्रम

शिव प्रतिष्ठान संस्थेची स्थापना 29 डिसेंबर 2000 रोजी श्री. मदनजी रेनगडे पाटील यांनी केली. तेव्हापासून महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून अनेक योजना यशस्वीरीत्या राबवून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. शिक्षण, साहित्य, कला, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसाय यांवर भरीव काम केले.

प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा बनून, प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत प्रशासकीय यंत्रणेत येणाऱ्या सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाला मदत केली. महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त सभासदांना त्यांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आर्थिक मदतही केली.

शिक्षण आणि साहित्य

  • हुशार गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप
  • विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्पर्धा परीक्षा
  • प्रमाणपत्र आणि बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान
  • नवोदित कवी-लेखकांना साहित्य प्रकाशनासाठी मदत

रोजगार आणि स्वयंरोजगार

  • हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे
  • बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावे
  • स्वयंरोजगार उद्योग व व्यवसायावर काम
  • कौशल्य विकास प्रशिक्षण

आरोग्य सेवा

  • ग्रामीण भागातील अनेक गावांत आरोग्य शिबिरांचे आयोजन
  • लोकांच्या आरोग्याची मोफत तपासणी
  • ग्रामीण जनतेला गावातच आरोग्य सेवा

कृषी विकास

  • शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव भाव मिळवून देणे
  • कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याचे प्रशिक्षण
  • उत्पादनावर प्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन
  • आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण

आर्थिक मदत आणि योजना

  • नैसर्गिक आपत्तीग्रस्त सभासदांना आर्थिक मदत
  • जीवन पूर्वपदावर येण्यासाठी सहाय्य
  • शासनाच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे
  • कंपनी ते ग्राहक योजना – जीवनावश्यक वस्तू कमी दराने

प्रशासकीय मदत

  • प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा
  • ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत अडचणी सोडविणे
  • शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शन
या आणि अशा अनेक योजना प्रत्यक्षात राबवून सामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शिव प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला.

आमची तत्त्वे

“सत्य सांगा लोकां | जरी कडू लागे | चाला नाही मागे | आला कोणं”

सामाजिक कार्यात सहभागी व्हा

स्वयंसेवक म्हणून, देणगीदार म्हणून किंवा सहकारी संस्था म्हणून – आमच्याशी संपर्क साधा.

आपल्या योगदानाने समाजात बदल घडतो

शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शेतकरी सहाय्यासाठी शिव प्रतिष्ठानला सहकार्य करा. प्रत्येक देणगीची पावती त्वरित मिळते आणि 80G अंतर्गत कर सवलत लागू आहे.