नोंदणीकृत सामाजिक संस्था · नोंदणी क्र. महा/534/2000 (परभणी) · आयकर 12A व 80G मान्यताप्राप्त · NGO Darpan MH/2023/0346653
सूचना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 – प्रस्ताव आमंत्रित. माहिती व अर्ज | रोजगार पोर्टल – बेरोजगार युवकांसाठी नोंदणी सुरू
नोंदणीकृत सामाजिक संस्था · स्थापना 2000 · परभणी व पुणे

समाजाच्या विकासासाठी,
समाजासोबत.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेतकरी सहाय्य आणि प्रशासकीय मदत – गेली 25 वर्षे महाराष्ट्रातील सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिव प्रतिष्ठान कार्यरत आहे.

  • आयकर 12A व 80G मान्यताप्राप्त
  • संस्था नोंदणी अधिनियम 1860
  • NGO Darpan नोंदणीकृत
महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळा, 26 ऑक्टोबर 2025 पुरस्कार विजेत्यांसह संस्थेचे पदाधिकारी
25+वर्षांचे सामाजिक कार्य
2000स्थापना – 29 डिसेंबर
25+वर्षांचे सातत्यपूर्ण कार्य
हजारोबेरोजगारांना रोजगार संधी
3राज्यस्तरीय पुरस्कार सोहळे – 2025
संस्थेचे पदाधिकारी मान्यवरांच्या भेटीदरम्यान
संस्थेच्या वाटचालीतील एक क्षण – पदाधिकाऱ्यांची मान्यवरांसोबत भेट
संस्थेविषयी

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी, 2000 पासून

शिव प्रतिष्ठान संस्थेची स्थापना 29 डिसेंबर 2000 रोजी श्री. मदनजी रेनगडे पाटील यांनी केली. तेव्हापासून महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबवून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

शिक्षण, साहित्य, कला, रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांत भरीव काम करतानाच प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून संस्था कार्य करते.

“जगाचा जो अन्नदाता आहे, तो उपाशी झोपला नाही पाहिजे. या सर्व शेतकरी-कष्टकऱ्यांच्या पाठीमागे शिव प्रतिष्ठान खंबीरपणे उभे असेल.”

श्री. मदनजी रेनगडे पाटील – संस्थापक अध्यक्ष
अध्यक्षांचे मनोगत व सामाजिक कार्य
कार्यक्षेत्रे

आम्ही काय करतो

संस्थेच्या स्थापनेपासून राबविण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमांची क्षेत्रे

शिक्षण आणि साहित्य

शिक्षण आणि साहित्य

गरीब हुशार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य, स्पर्धा परीक्षा व बक्षिसे; नवोदित कवी-लेखकांना प्रकाशनासाठी मदत.

रोजगार व स्वयंरोजगार

रोजगार व स्वयंरोजगार

रोजगार मेळावे, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार पोर्टलद्वारे हजारो बेरोजगार युवकांना संधी.

आरोग्य सेवा

आरोग्य सेवा

ग्रामीण भागातील गावांमध्ये आरोग्य शिबिरे आणि मोफत आरोग्य तपासणी – गावातच आरोग्य सेवा.

कृषी विकास

कृषी विकास

शेतमालाला वाढीव भाव, कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण.

आर्थिक मदत व योजना

आर्थिक मदत व योजना

नैसर्गिक आपत्तीग्रस्त सभासदांना आर्थिक मदत; शासकीय योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.

प्रशासकीय मदत

प्रशासकीय मदत

प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा – ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत अडचणी सोडविणे.

सविस्तर सामाजिक कार्य

प्रस्ताव आमंत्रित

महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026

समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, पत्रकारिता, कला, साहित्य, कृषी, उद्योग, पर्यावरण, क्रीडा, संस्कृती, सहकार, महिला सशक्तीकरण, युवा नेतृत्व, ग्रामीण विकास आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा राज्यस्तरीय सन्मान.

  • सन्मानपत्र, ट्रॉफी व पदक · फोटो / व्हिडिओ कव्हरेज · कुरिअर सुविधा
  • भव्य पुरस्कार वितरण सोहळा – पुणे
  • 2025 मध्ये तीन सोहळे यशस्वीपणे संपन्न (14 सप्टें., 26 ऑक्टो., 21 डिसें.)
पुरस्काराचे स्वरूप – सन्मानपत्र, ट्रॉफी व पदक महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 – माहितीपत्रक
सहभागी व्हा

संस्थेसोबत जोडले जाण्याचे मार्ग

रोजगार पोर्टल

बेरोजगार युवक-युवतींसाठी नोंदणी, नोकरी जुळवणी, करिअर मार्गदर्शन व मुलाखत तयारी. एकवेळ नोंदणी फी ₹500 – आजीवन सेवा.

दान करा

UPI (Google Pay, PhonePe, Paytm), कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे सुरक्षित ऑनलाइन दान. पेमेंट होताच पावती आपोआप तयार होते आणि ईमेलवर पाठवली जाते; 80G कर सवलत लागू.

पारदर्शकता व विश्वास

संस्था नोंदणी अधिनियम 1860 व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत; आयकर कायद्याच्या कलम 12A व 80G अंतर्गत मान्यताप्राप्त; NITI आयोग NGO Darpan वर नोंदणीकृत.

PAN AAJTS5745F · 80G URN AAJTS5745FF20231 · NGO Darpan MH/2023/0346653

क्षणचित्रे

कार्यक्रम आणि उपक्रम

पुरस्कार सोहळे, आरोग्य शिबिरे, रोजगार मेळावे आणि वृत्तपत्रांतील दखल

संपूर्ण गॅलरी पहा

आपल्या योगदानाने समाजात बदल घडतो

शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शेतकरी सहाय्यासाठी शिव प्रतिष्ठानला सहकार्य करा. प्रत्येक देणगीची पावती त्वरित मिळते आणि 80G अंतर्गत कर सवलत लागू आहे.